जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील अरागम भागात सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती होती. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून इतर दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बांदीपोरा येथील अरागम गावात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर १३ राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि बांदीपोरा पोलिसांच्या जवानांनी गावाला वेढा घालत तातडीने  शोध मोहीम सुरू केली. मोठ्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे. तर, याचं भागात लपलेल्या दुसऱ्या दहशतवाद्याला शोधण्यासाठी म्हणून शोधमोहीम राबविली जात आहे.

हे ही वाचा:

स्मृती मंधानाच्या शतकी खेळापुढे दक्षिण आफ्रिका निष्प्रभ

काश्मीरप्रमाणे जम्मूमध्येही ‘शून्य दहशतवाद धोरण’

ईव्हीएम मशीन मोबाईलद्वारे हॅक होऊ शकते का?

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी जम्मू-काश्मीरबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर ते म्हणाले की, सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद समूळ नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. काही दिवसांपूर्वी शिव खोडी ते कटरा जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये चालकाला गोळी लागून बस दरीत अडकली. या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १० जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

यानंतर दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तान सीमेजवळील हिरानगर येथील सैदा सोहल गावात घरांचे दरवाजे ठोठावले आणि पाणी मागितले. पुढे दहशतवाद्यांनी गोळीबारही केला. यामध्ये एक जण जखमी झाला. डीआयजी आणि एसएसपी आल्यावर एका दहशतवाद्याने त्यांच्या गाडीवरही गोळीबार केला. ग्रेनेड फेकताना दहशतवादी मारला गेला. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भदेरवाह-पठाणकोट मार्गावरील ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटना वाढल्याने अमित शाह यांनी बैठक घेत दहशतवाद विरोधी कारवाया तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Exit mobile version