जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला

हल्ल्यात तरुणाच्या हाताला लागली गोळी

जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला

Silhouette of special forces operators with weapons

जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा स्थलांतरित मजुरांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काश्मीरमधील स्थलांतरित मजुरांवर झालेला हा आठवड्याभरातील तिसरा हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात उत्तर प्रदेशमधील एक तरुण जखमी झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात उत्तर प्रदेशातील एक तरुण जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील शुबम कुमार (वय १९ वर्षे) या तरुणाच्या हातात गोळी लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्रालमधील बटागुंड गावात दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. काश्मीरमधील स्थलांतरित मजुरांवर आठवड्याभरातील हा तिसरा हल्ला आहे.

हे ही वाचा : 

पुण्यात पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू

सलमानसाठी धमकीचा संदेश पाठवणाऱ्या हुसैन शेखला ठोकल्या बेड्या

मविआचा ८५ चा फॉर्म्युला ठरला, उर्वरित जागांवर मित्र पक्षांसोबत चर्चा!

दहशतवाद-फंडिंगशी लढा देत, तरुणांना कट्टरतावादाकडे जाण्यापासून रोखायचय!

जम्मू- काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागात एका बांधकामाच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने २० ऑक्टोबर रोजी एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांसह सात जण ठार झाले होते. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. गगनीर ते सोनमर्गला जोडणाऱ्या झेड- मोर बोगद्यावर काम करणाऱ्या बांधकाम पथकातील हे सर्व मजूर होते. यानंतर पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. १८ ऑक्टोबर रोजी शोपियान जिल्ह्यात बिहारमधील परप्रांतीय कामगार अशोक चौहान यांची हत्या केली होती.

Exit mobile version