बिहारमधील एका सरकारी शाळेतील शिक्षकाला लोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हरेंद्र रजक यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना कोणीही मतदान करू नये, असे सांगितल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.
राजक यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकारी अजय कुमार सिंग यांनी एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, असे मुझफ्फरपूरचे एसएसपी राकेश कुमार यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.
हरेंद्र राजक हे बिहारमधील कुर्हानी ब्लॉकमधील अमरख येथील सरकारी माध्यमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना कोणीही मोदी यांना मत देऊ नये, असे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा:
पुण्यातील पोर्शे मृत्यूप्रकरण; गदारोळानंतर अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून सुनावणी होण्याची शक्यता
‘आम्ही देऊ मुस्लिमांना आरक्षण’
पुणे पोलिसांची कारवाई; फरार बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल अटकेत
पाचव्या टप्प्यात कुणाचा सुपडा साफ होणार?
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने एसएसपी राकेश कुमार यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. राजक हे वर्गात सर्वांना मोदी यांना मतदान करू नये, असे सांगत होते, असे शाळेतील अनेक मुले आणि मुलींनी सांगितले आहे. आदर्श आचारसंहितेनुसार, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यास मनाई आहे. यामुळे निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते.