राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका सरकारी रुग्णालयात एक गंभीर निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे, तिथे एक भटका कुत्रा जबड्यामध्ये मृत गर्भ घेऊन फिरताना दिसला. रविवारी संध्याकाळी जयपूर जिल्ह्यातील संगनेरी येथील महिला रुग्णालयाच्या गेट क्रमांक १ च्या बाहेर रस्त्यावर ही घटना दिसून आली. लोकांनी कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो गर्भ ऑक्सिजन प्लांटजवळ सोडून देत. हॉस्पिटलच्या भिंतीवर जाऊन बसला.
याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाने लाल कोठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या गर्भाची सोमवारी शवविच्छेदन करून गर्भाची विल्हेवाट लावली. हा गर्भ आठ महिन्याचा बालकाचा आहे. असे तपासात निष्पन्न झाले. तसेच कुत्र्याच्या चाव्यामुळे त्या बालकांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आले आहेत. पोलिसांनी मृत मुलाच्या कुटुंबाचाही शोध सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हा गर्भ मृत रुग्णालयातच जन्माला आला असावा. काही कारणास्तव कुटुंबाने मृत गर्भ परत घेण्यास टाळाटाळ केली असावी. तसेच त्या मृत गर्भाला जवळच्या जमिनीत पुरले असावे. व नंतर कुत्र्याने जमिनीतून खोदून काढले असावे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा :
व्हासटऍप व्हिडीओ कॉल आला आणि तरुण अडकला जाळ्यात
उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?
अस्सलाम वालेकुम लाचारांनो, अतुल भातखळकरांनी डिवचले
बारसू रिफायनरीतून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या बाहेर एक कुत्रा गर्भासह दिसला. त्यानंतर पोलिसांनी गर्भ ताब्यात घेतला. असं सांगणेरी गेट येथील महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ आशा वर्मा यांनी सांगितले तसेच महिला रुग्णालयाचे हाऊस कीपिंग सुपरवायझर सोहनलाल वर्मा यांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती लालकोठी पोलिस ठाण्याचे प्रभारी सुरेंद्र सिंह राठोड यांनी दिली. घटनास्थळी आजूबाजूला कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तेथील रुग्णालय प्रशासनाला १५ नोव्हेंबरपासून जन्मलेल्या मुलांची नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे.