आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी

वीज विभागाचे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह जियाउर्रहमान बर्क यांच्या घरी पोहोचले

आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ; सपा खासदार बर्क यांच्या घरावर वीज विभागाने छापा टाकताच वडिलांची धमकी

उत्तर प्रदेशातील संभल विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्या निवासस्थानी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. या भागातून वीज चोरीच्या अनेक घटना वारंवार समोर आल्याने वीज विभागाने ही कारवाई केली होती. जियाउर्रहमान बर्क यांच्या दिपसराय निवासस्थानातील जुने मीटर काढून नवे स्मार्ट मीटर बसवले. नवे मीटर लावण्यात आल्यानंतर जुने मीटर तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती होती. यानंतर गुरुवार, १९ डिसेंबर रोजी पहाटे वीज विभागाचे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह जियाउर्रहमान बर्क यांच्या घरी पोहोचले आहे.

पथकाकडून खासदारांच्या निवासस्थानी विजेबाबत तपासणी करण्यात आली. यावेळी खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्या वडिलांनी वीज विभागातील लोकांना धमकावल्याची माहिती आहे. ‘आमचे सरकार आले तर बघून घेऊ’ अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप केला जात आहे. विद्युत विभागाने कारवाई करत जियाउर्रहमान बर्क यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. तसेच वीज चोरीविरोधी कलम १३५ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जियाउर्रहमान बर्क यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्या घरात असलेल्या दोन वीज मीटरमध्ये छेडछाड झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. अलीकडेच वीज विभागाने त्यांच्या घरातील जुने मीटर काढून सील ठोकून प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले होते. जुने वीज मीटर काढून दोन नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले. हे मीटर तपासण्यासाठी आणि त्यांचे रीडिंग रेकॉर्ड करण्यासाठी विद्युत विभागाचे पथक पोहोचले आहे.

या संपूर्ण कारवाई दरम्यान जलद कृती दलासह पीएसी जवान तैनात होते. जलद कृती दलाचे महिला पथकही तैनात करण्यात आले होते. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. माहितीनुसार, ही कारवाई विद्युत विभागामार्फत सुरू असलेल्या तपास मोहिमेचा एक भाग होता. या मोहिमेअंतर्गत मोठ्या ग्राहक युनिट्स आणि राजकीय व्यक्तींच्या वीज कनेक्शनची तपासणी करण्यात येत आहे.

हे ही वाचा..

स्पीड बोटीतला माणूस प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन पडला आणि…

कुणीच लाईफ जॅकेट वापरले नाहीत, म्हणून…

जम्मू- काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; लष्कराच्या जवानांकडून पाच दहशतवाद्यांचा खात्मा

प्रवासी बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल

संभलमधील समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्या परिसरात विजेच्या वापरात अनियमितता झाल्याची माहिती विद्युत विभागाला मिळाली होती. खासदाराच्या आवारात दोन वीज जोडण्या असल्याची माहिती वीज विभागाने दिली होती. एक कनेक्शन जियाउर्रहमान बर्क यांच्या नावावर नोंदणीकृत दोन किलोवॅटचे आहे, जे मालमत्तेसमोर आहे. दुसरे कनेक्शन त्यांचे आजोबा शफीकुर रहमान बर्क यांच्या नावे दोन किलोवॅटचे आहे. आजोबांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या मीटरवरील नाव अपडेट करण्यात आले नाही.

Exit mobile version