उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात सुमारे १२ जणांचा मृत्यू झाला. अल्लाहगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर दाट धुक्यामुळे भरधाव ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला.या भीषण अपघातात डझनभर प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
शाहजहांपूर जिल्ह्यातील मदनापूर पोलीस स्टेशन हद्दीतील दमगर्हा गावातून घटिया घाट गंगेत स्नान करण्यासाठी हे सर्व भाविक जात होते.महामार्गावर दाट धुके असल्यामुळे हा भीषण अपघात झाला.गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या या अपघातात किमान १२ जणांचा मुत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच डीएम उमेश प्रताप सिंह, एसपी अशोक कुमार मीना आणि जलालाबादचे आमदार हरिप्रकाश वर्मा घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.याशिवाय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत आणि बचाव करण्याच्या योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
राम मंदिरात पहिल्या दिवशी तीन कोटी १७ लाखांची देणगी!
विजय पाटिदारची निवड योग्य, मात्र अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळणे कठीण!
उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!
कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षामध्ये आठ पुरुष, तीन महिला आणि एक मुलगा असे १२ जण प्रवास करत होते.या भीषण अपघातात सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे.या संदर्भात पोलिस अधीक्षक अशोक कुमार मीना यांनी सांगितले की, दमगडा गावातील लोक गंगा स्नान करण्यासाठी ऑटोने फारुखाबादमधील पांचाल घाटाकडे जात होते. बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर आल्हागंज येथील सुगुसुगी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली.या अपघातात १२ लोकांचा मृत्यू झाला. ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा तपास केला जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.