23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामा'डेटिंग ॲप'वर कोट्यावधी रुपयांना महिलेने तरुणाला लुटले

‘डेटिंग ॲप’वर कोट्यावधी रुपयांना महिलेने तरुणाला लुटले

Google News Follow

Related

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मुंबईमधील एका तरुणाला डेटिंग ॲपमुळे कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणाने तक्रार दाखल केली आहे. जानेवारी २०२२ मध्ये ही घटना घडली असून, पिडीत तरुणाने आता या घटनेची तक्रार दाखल केली आहे.

खारघर येथील एका ३८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरची डेटिंग ॲपवर एका फिलिपिन्स येथील महिलेशी ओळख झाली होती. जानेवारीमध्ये डेटिंग ॲपवर ‘रोझ चेन’ अशी ओळख देणाऱ्या महिलेने पीडित तरुणाशी मैत्री केली. ती तरुणी  फिलीपिन्सची रहिवासी असून तिचे नातेवाईक क्रिप्टो चलन गुंतवणुकीत आर्थिक सल्लागार असल्याचे  तिने सांगितले. त्या तरुणीला कसा क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्याने फायदा झाला हे पिडीत तरुणाला पटवून दिले. मागच्या वर्षी २ कोटींचा फायदा झाल्याचेही त्या तरुणीने सांगितले. त्यानुसार तरुणाने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

श्रद्धा वालकर प्रकरणातील लव्ह जिहाद अंँगलबद्दल काय बोलल्या स्मृति इराणी

आठ तासांची फिल्डिंग आणि चोर आले ताब्यात

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीला आराम पडतोय!

तिने पिडीत तरुणाला यूबीएस कॉइन एक्सचेंज आणि बायनान्स अशी दोन ॲप्स डाउनलोड करायला लावले. त्याने पहिल्यांदा १९९ डॉलरची गुंतवणूक केली तेव्हा त्याला २२९ डॉलरचा नफा झाला. नंतर त्या तरुणाने तब्बल १.६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यातून त्याला २.२ कोटी रुपयांचा नफा झाला. मात्र, ५ एप्रिल रोजी पिडीत तरुणाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्याचा व्यवहार नाकारण्यात आला. यूबीएस कॉइन एक्सचेंज कस्टमर केअरकडे चौकशी केल्यावर, त्याला सांगण्यात आले की त्याच्या ट्रेडिंग खात्यावरून ३६ हजार डॉलरचे दोन बेकायदेशीर व्यवहार केले गेले आहेत. नंतर, त्याने बायनान्स ॲपमध्ये चौकशी केली तेव्हा त्याला कळले की, यूबीएस कॉइन एक्सचेंज ॲप बनावट आहे. यानंतर या तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीची घटना जानेवारी ते मे महिन्यादरम्यान घडली होती. परंतु पीडितेने १८ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा