दोन वर्षांपूर्वी पूजा सोनी नावाची दिल्लीत राहणारी एक तरुणी अशोक राजपूत नावाच्या एका माणसाला भेटते. भेटीचे रूपांतर प्रेमात होते. ते दोघेही लग्न करतात. दोन वर्षांचा संसार होतो. त्या दोघांना एक मुलगीही होते आणि मग दोन वर्षानंतर अचानक पूजाला कळतं की ज्याला आपण ‘अशोक’ समजत होतो तो वास्तवात ‘अफजल’ आहे. हे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. अशोकचा मुखवटा गळून पडतो आणि समोर येतो अफजलचा क्रूर चेहरा.
दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात काम करणारी पूजा सोनी ही २०१९ साली अशोक राजपूत नावाच्या तरुणाला भेटली. अशोक हा प्लंबिंगची कामे करत होता. २१ वर्षांची पूजा आणि २३ वर्षांचा अशोक यांचे हळू हळू फोनवर संभाषण सुरू झाले. पूजा ही अशोकवर भाळली. त्याच्या प्रेमात पडली. पण पूजाला कल्पनाच नव्हती की हे प्रेम नसून तिच्यासाठी रचलेला एक सापळा आहे. अशोक आणि पूजा दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केले. दिल्लीतील नोएडा भागात दोघांनीही आपला संसार थाटला. दोन वर्ष सगळं सुरळीत सुरु होते. २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात त्या दोघांना एक मुलगीसुद्धा झाली.
हे ही वाचा:
मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’
मोदी सरकारची पीएलआय योजना ठरली ‘स्मार्ट’
मार्च महिन्यात अशोक पहिल्यांदा आपल्या बायको, मुलीला घेऊन अलिगढ येथील आपल्या मुळ गावी आला. तिथे पोहोचल्यावर पूजाला धक्का बसला. ज्या माणसावर आपण प्रेम केलं, लग्न केलं, संसार थाटला, ज्याच्यावर विश्वास टाकून आपण सर्वस्व अर्पण केलं त्यानेच आपला सर्वात मोठा विश्वासघात केला. गेली दोन वर्ष जो अशोक म्हणून वावरत होता तो अशोक नव्हताच. तो होता अफजल…अफजल खान! विश्वासघाताच्या या धक्क्यात असलेल्या पूजावर नंतर एका मागून एक संकटे कोसळू लागली.
पूजावर नमाज पठणाची जबरदस्ती सुरु झाली. हिंदू देवांची पूजा-प्रार्थना करण्यास तिला मज्जाव करण्यात आला. अत्याचारांच्या या मालिकेने ८ एप्रिल रोजी कळस गाठला. पूजाच्या मुलीला तिच्यापासून विभक्त केले गेले आणि डांबून ठेवण्यात आले. मुलीपासून ताटातूट झालेल्या पूजावर मग धर्मांतराची जबरदस्ती करण्यात आली. जबरदस्ती धर्मांतर करून तिचे नाव बदलून ‘आल्ना’ ठेवण्यात आले. नंतर तिला एका गाडीत कोंबून मथुरा येथे फेकण्यात आले. या सगळ्या प्रकारात अशोक बनून फसवणूक करणारा अफजल खान आणि त्याच्या दोन बहिणींचा समावेश होता.
शुक्रवार १० एप्रिल रोजी अलिगढ येथील लोढा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या धर्मांतरविरोधी कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. यात अफजल खान आणि त्याच्या दोन्ही बहिणींची आरोपी म्हणून नावे आहेत. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने या संबंधीचे वृत्त दिले आहे .