मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी

मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवार, १० एप्रिल रोजी मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये हा वाद झाला. या हाणामारीमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यापीठाच्या कावेरी वसतीगृह खानावळीत रविवारी मांसाहारी जेवण तयार केले जात होते. त्याला मज्जाव करण्याचा प्रयत्न अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे.

मारामारी, वादानंतर दोन्ही गटांच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात रात्रभर निदर्शने केली. दरम्यान अन्य एका आरोपानुसार याच वसतीगृहात रामनवमीपूजेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत दोन्ही बाजूंकडील सहा विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण सहा विद्यार्थी जखमी झाले असून या सर्व हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अभविपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार रामनवमीच्या पूजेचे आयोजन केलं असता त्या ठिकाणी डव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी येऊन आंदोलन केलं. याच रागामधून अभविप आणि डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांमधील काही लोक जखमी झाले आहेत. तर मांसाहार बनवल्या प्रकरणी हा वाद झाल्याचे काहींचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत

पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा भाजपा करणार सत्कार! पाच लाखांचा पुरस्कारही जाहीर

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

विद्यापीठाने पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांवर काही गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून गैवर्तन खपवून घेतलं जाणार नसल्याचे जेएनयू प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version