इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर ) च्या एका शास्त्रज्ञाला धमकीचे ई-मेल आणि दोन व्यक्तींचा शिरच्छेद करतानाचा विडिओ एका अज्ञात व्यक्तीद्वारा पाठवण्यात आले. ह्या घटनेनंतर त्यांने त्वरित पोलीसांत तक्रार दाखल केली.
पवई येथे राहणार्या आयसीएमआर शास्त्रज्ञाने सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी त्यांना ५० हजार रुपये भरण्यास सांगणारा एक ईमेल आला. ती रक्कम न भरण्याने त्यांचा शिरच्छेद केला जाईल अशी धमकीही दिली . पाठवणाऱ्याने सांगितले की तो खूप धोकादायक आहे आणि त्याने आधीच तीन जणांना शिरच्छेद करून मारले आहे. मेल पाठविणाऱ्याने सांगितले की त्याने २०१२ ते २०१५ पर्यंत चार वर्षे मेक्सिको कार्टेलसाठी काम केले आहे. पुढे त्या माणसाने असे म्हटले की बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एक डॉक्टर त्याचा शेवटचा बळी होता, ज्याचा त्याने पैसे न दिल्याने त्याचा शिरच्छेद केला.
हे ही वाचा:
फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे कंपन्यांच्या ठिकाणांवर ईडीचे छापे
मीटर रिकेलिब्रेशन प्रकिया आता वादाच्या भोवऱ्यात
सचिन वाझेला जामीन मंजूर, पण सुटका नाहीच
“धमकीच्या मेलसह प्रेषकाने अज्ञात ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींचा शिरच्छेद करण्याचे व्हिडिओ देखील जोडले होते. परंतु ते अफगाणिस्तानमधील असल्याचे दिसते. मेलमध्ये त्याने असेही म्हटले आहे की जर तो [शास्त्रज्ञ] २४ तासांच्या आत पैसे देऊ शकला नाही तर , तो त्याला कॉल करणार नाही किंवा मेसेजही करणार नाही तर थेट चाकूने त्याचा शिरच्छेद करील,” एका अधिकाऱ्याने मिळालेल्या ई-मेल बद्दल सांगितले.
पोलिसांनी अज्ञात ईमेल पाठवणार्याविरुद्ध धमकी देणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदविला. पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिस सध्या सायबर सेलची मदत घेत आहेत.