धार्मिक स्थळावर संताने केली आत्महत्या, गुरू स्वप्नात आले आणि …

धार्मिक स्थळावर संताने केली आत्महत्या, गुरू स्वप्नात आले आणि …

विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या एका विशिष्ट धर्माच्या ७१ वर्षीय संताने धार्मिकस्थळाच्या ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व येथे बुधवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये या संताने ‘मला माझ्या गुरूने स्वप्नात दृष्टांत दिला आहे, माझे पृथ्वीवरील काम संपले असून तुम्ही परत या आपण पूजा करू’ असे लिहून ठेवले आहे.

याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे दिखाऊपणा

डीएपीच्या भाववाढीला शरद पवार, मनमोहन सिंह जबाबदार

ठाकरे सरकारची ‘सोशल’ असहिष्णुता

लसीचा एक डोसही वाया घालवू नका, मोदींनी दिला कानमंत्र

आत्महत्या केलेले संत हे घाटकोपर पूर्व पंतनगर येथील लव गार्डन येथील धार्मिकस्थळावर राहण्यास होते. ७१ वर्षीय या संतावर २०२१ मध्ये मुलुंड पोलिस ठाण्यात १९ वर्षाच्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी या संताला अटक देखील केली होती, त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले होते. स्थानिक न्यायालयात हे प्रकरण सुरू होते. या गुन्ह्यात न्यायालयाने संताला दोषी ठरवले होते. या संताने त्यानंतर सत्र न्यायालयात अपील केले होते. सत्र न्यायालयात देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता, अशी माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली.

बदनामी आणि शिक्षेच्या भीतीने संत यांनी सुसाईड नोट लिहुन त्यात ‘मला माझ्या गुरूने स्वप्नात दृष्टांत दिला आहे. त्यात त्यांनी माझे पृथ्वीवरील काम संपले असून तुम्ही परत या आपण पूजा करू’ असे नोंद करून बुधवारी रात्री धार्मिक स्थळ याठिकाणी गळफास लावून आपले जीवनयात्रा संपवली.

याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version