पुण्यातील एका सराफ व्यवसायिकास सोने शुध्द करुन देतो, असे सांगून नातेवाईक आणि त्याच्या दाेन साथीदारांच्या मदतीने १३५० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन गेले व ते सोने परत न करताच तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तीन आराेपींवर फरासखाना पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना दिली.
याबाबत माणिक ज्ञानू बर्गे (५०) यांनी पोलिसांकडे आराेपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. तसेच तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये श्रीकृे्ण तुकाराम यमगर, नितीन नामदेव डाेंबाळे व अनिल ऊर्फ विठ्ठल दादा गाेरे या तीन आराेपींची नावे समोर आली आहेत. त्यापैकी फिर्यादी बर्गे आणि आरोपी यमगर हे दोघे नातेवाईक आहेत. तसेच उर्वरित इतर दोघे एकमेकांचे साथीदार असल्याची माहिती मिळावी आहे.
हे ही वाचा
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
रेल्वे गाड्यांनमधून पडून ४८७ प्रवाशांनी गमावले प्राण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार माणिक बर्गे यांचे पुण्यातील रविवार पेठेत सराफाचे दुकान आहे. बर्गे यांचा श्रीकृष्ण यमगर हा नातेवाईक आहे. तर नितीन डाेंबाळे हा यमगर याचे साेने रिफायनरी दुकानातील मॅनेजर आहे. आरोपींनी बर्गे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या कडून ७५ लाख रुपये किंमतीचे सोने नेले. परंतु १३५० ग्रॅम वजनाचे २४ कॅरेटचे सोने नेऊन ते परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. सोने परत मागण्यासाठी ते गेले असताना आराेपींनी त्यांना दमदाटी केली आहे. याबाबत फरासखाना पोलिस गुन्हा दाखल करण्यात आले असून, फरासखाना ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. माेकाशी हे पुढील तपास करत आहे.