पोलीस कर्मचाऱ्याकडून ७ हजाराची लाच मागणारा सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

पालघर मधील घटना

पोलीस कर्मचाऱ्याकडून ७ हजाराची लाच मागणारा सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

पदोन्नतीसाठी अर्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याकडे लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वर्ग १ (सरकारी वकील) सुनील बाबुराव सावंत याला ७ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.पालघर जिल्ह्यातील हुतात्मा स्तंभाजवळ वकील सावंत याला रंगेहाथ पकडत लाचलुचपत विभागाकडून अटक करण्यात आली.

सुनील सावंत हे गेल्या सात वर्षांपासून पालघर येथील नायालयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते.पालघर जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक यांच्यावर सन २०१५ मध्ये तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३/ १५ कलम ३७६ भादंविप्रमाणे दाखल होता.जून २०२३ मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला आणि न्यायालयाकडून पोलीस नाईकास निर्दोषमुक्त करण्यात आले होते.त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने पदोन्नतीसाठी अर्ज केला होता.
त्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पालघर त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता.

हे ही वाचा:

वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक

बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!

इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला

तो अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यासंबंधी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड करून दहा हजारावरून सात हजार रुपये देण्याचे ठरले.सरकारी वकील सुनील बाबुराव सावंत याने रक्कम स्वीकारण्यासाठी हुतात्मा स्तंभा जवळ आला व ती रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वकिलास रंगेहाथ पकडले.

केलेल्या कारवाईत दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक, शिरीष चौधरी, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार अमित चव्हाण, पोलीस हवालदार संजय सुतार, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार नितीन पागधरे, पोलीस हवालदार योगेश धारणे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी आणि पोलीस शिपाई जितेंद्र गवळी यांचा समावेश होता.

Exit mobile version