जम्मू आणि काश्मीरमधील एक पोलिसावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हा पोलिस जबर जखमी झाल्याची घटना रविवारी श्रीनगरमधील इदगाड मशिदीजवळ घडली. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्कर समर्थित दहशतवादी संघटना द रेसिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
या पोलिसाचे नाव मसरूर अहमद वणी असे आहे. हा पोलिस इदगार मैदानावर काही स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती काश्मीर झोनमधील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. हा गुन्हा करण्यासाठी दहशतवाद्यांनी पिस्तुलाचा वापर केला होता.
‘दहशतवाद्यांनी पोलिस निरीक्षक मसरूर अहमद यांच्यावर श्रीनगरमधील इदगाहजवळ गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यासाठी पिस्तुलाचा वापर करण्यात आला आहे. गोळीबारानंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ‘एक्स’वर दिली.
हे ही वाचा:
आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!
चक्क काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल अदानींच्या फायद्यासाठी काम करतात!
भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!
उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लश्कर समर्थित दहशतवादी संघटना द रेसिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी परिसरातील सीसीटीव्हींची मदत घेतली जात आहे. ही हत्या या परिसरात सक्रिय असणाऱ्या लश्करच्या मोमिन आणि बासित दार याने केल्याची माहिती या सूत्रांनी दिली.