पोलिसांच्या गाडीने चार जणांना उडवलं

अपघातात एकाचा मृत्यू; तीन जण जखमी

पोलिसांच्या गाडीने चार जणांना उडवलं

सातारा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील कराड- ढेबेवाडी मार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना धडक दिली. या वाहनाने चार जणांना धडक दिली असून या घटनेमध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास चार तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने या तरुणांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. सुजल कांबळे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. दरम्यान, गाडी चालवणाऱ्या पोलिस चालकाने मद्यपान केल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली

बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!

बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!

इस्रायलचा वेस्ट बँकमधील मशिदीवर बॉम्बहल्ला

मृत तरूण हा कोळेवाडीचा तर जखमी तरूण कुसूरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version