26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामंदिरात नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला अटक

मंदिरात नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला अटक

उत्तरप्रदेशमध्ये पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

उत्तरप्रदेशमध्ये मंदिरात नमाज पठण करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद अकरम असल्याचे समोर आले आहे.

उत्तरप्रदेशच्या हापूड येथील चंडी मंदिरात एक व्यक्ती नमाज पठन करत होता. नमाज पठण केल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना कळवले असता पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन

धुळ्यात अनधिकृत टिपू सुलतान स्मारक रात्री उशिरा हटविले

डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय 

ओमराजेंच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; अपघात की घातपात?

मोहम्मद अक्रमने पोलिसांना सांगितले की, आपल्यासाठी मंदिर आणि मशिद समान असल्यामुळे मंदिरात जाऊन नमाज पठण करावे असे आपल्या मनात आले. त्यामुळे हे कृत्य केल्याची कबुली अकरमने दिली आहे. दरम्यान, अकरमने केलेले कृत्य अयोग्य असून इतरांच्या धार्मिक स्थळावर जाऊन नमाज पठण करणे योग्य नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान पोलिस आरोपी अक्रमची चौकशी करीत असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा