या दिवसात सर्व संभाव्य मार्गांनी फसवणूक होत आहे. पण आता ही फसवणूक चक्क मंत्रालयात झाली! ७३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन पुरुषांसह एका शिपायाला अटक झाली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने मंगळवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव शिपाई सचिन डोळस असे आहे. महादेव शिरवाळे आणि नितीन साठे हे इतर दोन फसवणूक करणारे आरोपी आहेत. त्यांच्यावर फसवणूक, विश्वासभंग आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या १२० बी आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मुख्यतः चेकद्वारे पैसे स्वीकारल्यामुळे पोलिसांनी त्यांची खाती गोठवली आहेत. त्यांचे मोबाईल फोन आणि काही बनावट नियुक्तीपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
माहितीनुसार आरोपी महेंद्र सपकाळ हा अजून फरार आहे. १० हून अधिक नोकरी शोधणाऱ्यांची फसवणूक झाली असली तरी मालाड येथील सागर जाधव याने पोलिसांकडे ही तक्रार दिली आहे. त्यांनी आरोप केला की सकपाळने दावा केला की ते मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या, विशेषतः नितीन कुंडलिक साठे यांच्या बरोबर…त्यांनीच सपकाळला नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली. “सकपाळनी ज्या प्रकारे साठेचे वर्णन केले, त्यावरून मी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. सकपाळनी मला सांगितले की, जर मी त्यांना ६ लाख रुपये दिले तर मला मंत्रालयात ‘चांगली कायमस्वरूपी नोकरी’ मिळू शकते. आमचा विश्वास जिंकण्यासाठी सकपाळ यांनी आम्हाला चेकने पैसे देण्यास सांगितले “, असे तक्रारदार सागर जाधव यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पदयात्रेच्या विश्रांतीदरम्यान राहुल गांधी जाणार का सुट्टीवर?
चेतन भगत सांगतात, भाजपाकडून शिकण्यासारख्या सहा गोष्टी ज्यात लपले आहे यशाचे रहस्य
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ११ आरोपी तबलिगी जमातचे सदस्य
‘आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, मात्र काही ठिकाणी षडयंत्र केले जाते’
सागर जाधव आणि त्याच्या दोन भावांनी सपकाळ वर विश्वास ठेऊन त्याला ९ लाख रुपये दिले . सपकाळने त्याला मंत्रालयात सचिन ढोलास (शिपाही) याला भेटण्यास सांगितले. तिथं चक्क त्यांची मुलाखत घेण्यात आली. नितीन साठे (आरोपी २) यांनी संयुक्त सचिव म्हणून त्यांची मुलाखत घेतली. पोलिसांनी सांगितले की जुलै २०२० नंतर सकपाळ यांनी पीडितांचे कॉल टाळण्यास सुरुवात केली आणि दावा केला की कोविड -१९ लॉकडाऊनमुळे त्यांच्या सामील होण्यास विलंब झाला आहे. “नंतर सकपाळ म्हणाले की, साठे त्यांचे पैसे घेऊन पळून गेले… त्यानंतर जाधव यांनी चेंबूर पोलीस स्टेशन गाठले, जिथे एफआयआर नोंदवण्यात आला. हे प्रकरण नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले,” अधिकाऱ्याने सांगितले.