हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं

पंजाबच्या अमृतसरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई

हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं

पंजाबच्या अमृतसरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी करणारे एक पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करून पाडल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाई दरम्यान ड्रोनने वाहून आणलेला तीन किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आल्याचे वृत्त ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ने दिले आहे.

बीएसएफचे डीआयजी संजय गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या दोन- तीन दिवसांपासून हेरॉइनचे तस्करी करणारे ड्रोन भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नाात होते. या तस्करी करणाऱ्या ड्रोनला पाडण्यात यश मिळाले असून जवळपास ३.२ किलो हेरॉईनचे तीन पाकीट जप्त करण्यात आली आहेत. ड्रोनने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. या ड्रोनवर अमृतसर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ड्रोनने अंमली पदार्थाच्या तीन बॅग्स वाहून आणल्या होत्या.

गेल्या दोन दिवसात बीसएफच्या जवनांनी चार ड्रोन पाडले आहेत. तसेच अद्याप सर्च ऑपरेशन सुरू आहे. महिन्याभरात जवनांनी पाच ड्रोन पाडले असून पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब येथून सीमा ओलांडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी करण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले असून लष्कराने हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

हे ही वाचा:

सुलोचना दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमात होणार अंत्यसंस्कार

अपघातानंतर बालासोर येथून ५१ तासानंतर पहिली रेल्वे निघाली, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना!

सुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत

बालासोर रेल्वे दुर्घटनास्थळी मदतीसाठी एकवटले शेकडो हिंदू कार्यकर्ते !

ड्रोनच्या घुसखोरीमध्ये वाढ झाल्याचे चित्र

२०२१ च्या तुलनेत भारतीय हद्दीत पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानच्या सीमेवर सुमारे २३० ड्रोन दिसले होते. तर, २०२१ मध्ये ही संख्या १०४ इतकी होती आणि २०२० मध्ये हा आकडा ७७ होता.

Exit mobile version