छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला नक्षलविरोधी कारवाईमध्ये मोठे यश आले आहे. छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक नक्षली ठार झाल्याची माहिती आहे. तर नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटकांचा स्फोट होऊन दोन जवान जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तूल, जिवंत आयईडी आणि नक्षली साहित्य जप्त केले आहे.
बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगा जंगलात ४० नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवार सकाळी या परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान, मुंग्याच्या जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे जवान दिसताच त्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरू केला. जवानांनी याला प्रत्युत्तर दिले असून यात एक नक्षली ठार झाल्याची माहिती आहे. यानंतर घटनास्थळावरून पिस्तूल, जिवंत आयईडी आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुंगा गावाजवळ नक्षलवाद्यांनी जवानांवर आयईडीचा स्फोट केला. त्यामुळे दोन डीआरजी जवान योगेश्वर शोरी आणि मंगलू कुडियम हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
STORY | Naxalite killed in encounter, 2 security personnel injured in IED blast in #Chhattisgarh
READ: https://t.co/tW8DqdRAk2 pic.twitter.com/tvKTuPi78f
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2024
हे ही वाचा :
संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना!
बांगलादेश सरकारने केले कबूल, म्हणाले हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या ८८ घटना घडल्या!
बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर
वेलकम फेम मुश्ताक खान यांचेही केले होते अपहरण!
नक्षलग्रस्त राज्यांमध्ये सध्या नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. डाव्या विचारसरणीचा कट्टरवाद हा आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि पुढील दोन वर्षांत त्याचे पूर्णपणे उच्चाटन केले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.