हिंगोलीत अल्पवयीन मुलाने कुह्राडीने केली वडिलांची हत्या

कोणाला कळू नये म्हणून मृतदेहाजवळ काढली रात्र जागत

हिंगोलीत अल्पवयीन मुलाने कुह्राडीने केली वडिलांची हत्या

वडील आपल्यावर रागावतात या कारणाने मानेवर कुह्राडीचे वार करून अल्पवयीन मुलाने त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे. पण ही घटना बाहेर कळली तर त्याचे वाईट परिणाम होईल या भीतीपोटी वाच्यता न करता त्याने संपूर्ण रात्र जागून काढली. कुटुंबीयांनी सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली होती पण पहाटेच पोलीस घरी धडकले आणि सर्व प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय भाऊराव पांडुरंग कबले हे सेलू, हिंगोली  येथे पत्नी आणि तीन कुटुंबियांसह रहात होते. उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने कबले दाम्पत्य रोज मजुरी करून कुटुंब चालवत होते.

२७ फेब्रुवारीला सोमवारी भाऊराव आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला होता. त्यात भाऊराव यांच्या पत्नीने मध्यस्थी केली तरी त्यावर भाऊराव यांनी त्याला रागवायला सुरवात केली तेव्हा संतापलेल्या मुलाने बाजेवर असलेल्या वडीलांच्या मानेवर कुह्राडीने  वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे घरातील कुटुंबीय घाबरून गेले होते. ही घटना जर का कळल्यास गावात वाईट परिणाम होतील. या भीतीपोटी त्यांनी रात्र जागूनच काढली.

हे ही वाचा:

राहुल गांधी आता तपस्वी नाहीत

संजय राऊत यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे!

शेकापला फटका, धैर्यशील पाटील भाजपात दाखल

‘कोविड प्रकरणात जवळच्या माणसाला अटक केल्यामुळे संजय राऊत प्रचंड निराश’

२८ फेब्रुवारीला सकाळी सगळ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली पण तरीही कुरुंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना  कळल्याने जमादार तुकाराम आम्ले, बालाजी जोगदंड, यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मृतदेहाची पाहणी केली त्यावेळेस उपस्थित असलेल्यांपैकी सर्वांची चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलाने भाऊराव यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुंजाजी कबले यांनी दुपारच्या सुमारास या प्रकरणी पुरंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. भांडणाच्या रागात अल्पवयीन मुलाने आपल्याच वडिलांच्या मानेवर  कुह्राडीचे घाव घालून त्यांचा खून केला. या खुनाची माहिती पोलिसांना आणि इतरांना दिल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे करत आहे.

Exit mobile version