27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाअमरावतीत टेम्पो ट्रॅव्हल अपघातात चार क्रिकेटपटूंचा मृत्यू!

अमरावतीत टेम्पो ट्रॅव्हल अपघातात चार क्रिकेटपटूंचा मृत्यू!

भीषण अपघातात १० जण जखमी, रुग्णालयात दाखल

Google News Follow

Related

अमरावतीमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावर नांदगाव-खंडेश्वरलगत शिंगणापूर येथे एका ट्रकने टेम्पो ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

अमरावती शहरातील हे १५ तरुण यवतमाळ येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हल्समधून निघाले होते.त्याच वेळी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नांदगाव खंडेश्वरपासून काही अंतरावर असणाऱ्या शिंगणापूर फाट्यालगत भरधाव वेगात असणाऱ्या सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रकनं टेम्पो ट्रॅव्हलला धडक दिली.या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले तर अन्य १० जण गंभीर जखमी झाले.या भीषण अपघातात श्रीहरी राऊत, आयुष बहाळे, सुयश अंबरते, संदेश पाडर या चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!

कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

यूपी: कॉन्स्टेबल भरती देण्यास निघाली ‘सनी लिओनी’!

गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी राष्ट्रीय अधिवेशन

अपघात होताच शिंगणापूर येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले येत पोलिसांना या घटनेची माहिती दिली.नांदगाव खंडेश्वर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.अपघातात जखमी झालेल्या तरुणांना नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, अपघातात जखमी झालेल्या तरुणांची प्रकृती अत्यंत गंभीर असलेल्याने त्यांना अमरावती शहरात उपचारासाठी हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व जखमींना तत्काळ अमरावती शहरातील रिम्स रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, या गंभीर घटनेचा तपास केला जात असल्याची माहिती नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोळंके यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा