26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश!

‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश!

मुस्लीम धर्मगुरूला अटक, भरूच पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

बकरी ईदनिमित्त भरूच पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ईदनिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘बळीं’च्या जनावरांच्या यादीत गायीचा समावेश करणाऱ्या एका मुस्लीम धर्मगुरूला अटक करण्यात आली आहे. मौलवी अब्दुल रहीम राठोड असं या मुस्लीम धर्मगुरूचं नाव आहे. त्याने ‘बळीं’च्या जनावरांची यादी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर भरूच पोलिसांनी या पोस्टची दखल घेत मुस्लीम धर्मगुरूवर कारवाई केली आहे.

अहमदाबादच्या भरुचमधील रहिवासी असलेल्या मौलवी अब्दुल रहीम राठोड या मुस्लीम धर्मगुरूने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने बकरी ईद निमित्त दिल्या जाणाऱ्या बळीच्या जनावरांची यादी दिली होती. या यादीत त्याने म्हशी आणि उंटाबरोबरच गायीचा देखील समावेश केला होता. मुस्लीम धर्मगुरूने ही यादी पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेतला.

हे ही वाचा:

झारखंडच्या सिंगभूममध्ये चकमक, ४ नक्षलवादी ठार!

मोदी-पोप भेटीच्या पोस्टवर काँग्रेसचा माफीनामा

जगातील सर्वांत उंच रेल्वेपुलावरून धावली ट्रेन!

‘भाजपवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही’

यानंतर भरुच पोलिसांनी या पोस्टची दखल घेत मुस्लीम धर्मगुरुवर कारवाई केली आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचं भरुच पोलिसांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे या धर्मगुरुला २०२२ मध्येदेखील अटक करण्यात आली होती. जबरदस्तीने आदिवासींचे धर्मांतरण केल्याच्या आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी तो जामीनावर बाहेर होता. दरम्यान, जनावरांची यादी पोस्ट केल्यानंतर त्याला आता पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (अ), २९५ (अ), ५०४ आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा