गिरगावमधील चारमजली इमारतीला आग; दोन ठार!

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

गिरगावमधील चारमजली इमारतीला आग; दोन ठार!

गिरगाव चौपाटीजवळील एका चारमजली इमारतीला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत दोन जण ठार झाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. या आगीत तिघांना सुखरूप बाहेर काढल्याची माहिती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली. इमारतीच्या आत आणखी अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटीजवळील गोमती भवन इमारतीमध्ये ही आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे. ही आग इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यापर्यंत पसरली होती. रांगणेकर रोडवरील गोमती भवन इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती शनिवारी रात्री साडेनऊ वाजता मिळाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मिर्झापुरचा कुख्यात दरोडेखोर मुंबईत जेरबंद!

मुंबई वाहतूक विभागाकडून २५० कोटी रुपये दंडाची वसुली!

भाजपाची राजस्थानात मुसंडी, मध्य प्रदेशातही संपूर्ण बहुमताकडे

आरिफ बनला वीर… हिंदू मुलीवर बलात्कार, धर्मांतर, गर्भपात

त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या आणि आग विझवू लागल्या. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.इमारतीमधून दोन जणांचे मृतदेह मिळाले आहेत. यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे दोन्ही मृतदेह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सापडले. एक मृतदेह बेडरूममध्ये तर दुसरा बाथरूममध्ये आढळला.

Exit mobile version