31 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरक्राईमनामाबेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक

बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक

मुंबई पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यात दोन कोटींची मागणीही करण्यात आली होती. या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे येथून एका व्यक्तीला अटक केली आहे .

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला एक मेसेज प्राप्त झाला होता. त्यात लिहिले होते की, दोन कोटींची खंडणी न दिल्यास सलमान खान याला जीवे मारणार. यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाल्याच्या एका दिवसानंतर संबंधित मेसेज करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख आझम मोहम्मद मुस्तफा असून तो बांद्रा पूर्व येथील रहिवासी आहे. आझम हा विवाहित असून काहीही कामधंदा करीत नाही. पैसे कमविण्यासाठी त्याने या मार्गाचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने मेसेज करून “ये एक मजाक नही है,बाबा सिद्दीकी को कैसे खतम किया अगला निशाना झिशान सिद्दीकी है, और सलमान खान को भी सेम तरह गोली मार दी जाएगी,सलमान खान और झिशान सिद्दीकी को २ करोड रुपये देणे बोलो, अगर जान बचाना है तो उसको मजाक मे मत लेना ये कोई जाके 31ऑक्टोबर के दिन पता चल जाऐगा, वॉर्निंग टू झिशान सिद्दीकी अँड सलमान खान, या प्रकारचा मेसेज करून धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

मंगळवारी, सलमान खान आणि वांद्रे पूर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांना धमक्या दिल्याबद्दल नोएडामधून एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. मोहम्मद तय्यब नावाच्या आरोपीने झीशान सिद्दिकी आणि सलमान खान यांच्याकडेही पैशांची मागणी केली होती.

हे ही वाचा : 

दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा!

५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी

मसालाकिंग धनंजय दातार यांच्यातर्फे फुफ्फुस विकारग्रस्तांना प्राणवायू उपकरण संचांची भेट

सलमान खान याला यापूर्वीही अशीच धमकी काही दिवसांपूर्वीही आली होती. त्यानंतर आरोपीने माफी मागत चुकून मेसेज केल्याचे म्हटले होते. त्याला पुढे अटकही करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव समोर आलं असून या प्रकरणानंतर सलमान खानला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. १९९८ मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमान खानच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबारही झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा