नेरुळ स्थानकावर रेल्वे पोलिसांनी एका ३३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. कारण तो तरुण परवानगीशिवाय एका महिलेचे फोटो काढत होता. हे लक्षात येताच महिलेच्या भावाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
एक महिला तिची मुलगी, भाऊ आणि तिची मैत्रीण मध्यरात्री घरी परत जात होते. रात्रीच्या वेळी प्रवास करताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्यासोबत लोकलच्या डब्ब्यातून प्रवास करत होता. काही वेळानंतर त्याने त्या महिलेचे फोटो काढायला सुरुवात केली. महिलेच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रेनचा डब्बा सुद्धा बदलून पहिला पण तो तरुण त्यांचा पाठलाग करत दुसऱ्या डब्ब्यातही आला. तिच्या भावाने हे कृत्य पहिले आणि विचारपूस केली. काही वेळाने इतर प्रवाशांनीही या माणसाला बेदम मारहाण केली. त्याला वडाळा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यक्तीची ओळख फरीद अन्सारी अशी झाली असून तो मानखुर्दचा रहिवासी होता.
हे ही वाचा:
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार ताब्यात
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सापडल्या सोन्याच्या खाणी
१४ वर्षे गायब असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक करताना ओळखली ही खूण
वडाळा रेल्वे पोलिसांनी त्याला वाशी पोलिसांच्या स्वाधीन केले आणि तेथे त्याला पाठलाग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. वाशी रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे म्हणाले, महिला पनवेल-सीएसएमटीच्या लेडीज कोचमध्ये चढत असताना आरोपीही तिच्या मागे डब्यात आला. अटक करण्यात आलेला आरोपी फरीद अन्सारी हा मानखुर्दचा रहिवासी आहे. त्याला मंगळवारी सकाळी सीएसएमटी रेल्वे कोर्टात हजर करण्यात आले, जिथे त्याला दंडात्मक कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढे मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.