मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८३ लाखांचे कोकेन जप्त !

मुंबई कस्टम विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८३ लाखांचे कोकेन जप्त !

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने १५-१६ ऑगस्टच्या रात्री मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची बाजारातील किंमत ४ कोटी ८३ लाख असल्याची माहिती आहे. अटक करण्यात आलेला केनियन नागरिक असल्याची पुष्टी झाली आहे.

परदेशातून देशात सोने, ड्रग्स, कोकेन आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून हे एक मोठे जाळे आहे. यामध्ये परदेशातील व्यक्ती देशातील विविध राज्यात आपल्या एजेंट द्वारे माल पोचवण्याचे काम करतात. देशातील कस्टम विभाग अशा लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करतात. तशीच एक कारवाई मुंबई कस्टम विभागाने केली आहे. कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर कारवाई करत तब्बल ४ कोटी ८३ लाख रुपयांचा कोकेन जप्त केले आहे.

हे कोकेन एका केनियन नागरिकाने स्वतःच्या शरीरात लपवले होते. कस्टम विभागाने केनियन नागरिकाला ताब्यात घेऊन ४८२.६६ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. अटक करण्यात आलेला केनियातील काकामेगा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा :

धक्कादायक ! कार चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, दोघांचा मृत्यू !

नाशिक ते कानपूर; जिहादचा ताजा अंक

राहुल गांधींना ‘पहिल्या रांगेत’ बसवण्यासाठी लागल्या रांगा!

मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचा राऊतांना पाठींबा असेल का?

 

Exit mobile version