पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!

आठवड्यातील दुसरी घटना

पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!

प्रशिक्षणादरम्यान रविवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील गोजुबावी गावाजवळ एक विमान कोसळलं आहे.गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना आहे.पुणे जिल्ह्यातील गोजुबावी गावाजवळ रविवारी प्रशिक्षण सत्रादरम्यान एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, अशी माहिती पुणे ग्रामीण कार्यालय विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि प्रशिक्षकासह विमानातील दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रविवारी सकाळी ८ च्या सुमारास हे विमान कोसळल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

लँडिंगच्या काही तासांनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DCGA) निवेदन जारी करण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की,रेड बर्ड अकादमी टेकनॅम विमान VT-RBT ने बारामती एअरफील्डजवळ आपत्कालीन लँडिंग केले. प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी दोघेही सुरक्षित आहेत. पुढील तपास सुरू आहे.”असे निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा.. 

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले की, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत, असे ते म्हणाले.

चार दिवसात दुसरी घटना
मागील काही दिवसापूर्वी बारामती तालुक्यातील कटफल येथे रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान लँडिंग करताना कोसळलं होत.या दुर्घटनेत विमानातील पायलट शक्ती सिंग याना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती होती.विमानाचे ट्रेनिंग देण्याचं काम बारामतीमध्ये देण्यात येत.या दरम्यान ही दुर्घटना घडली होती.

 

 

 

 

Exit mobile version