भिवंडीत लिफ्ट कोसळल्यामुळे एका ४६ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. लिफ्टमधून तो काही जड साहित्य खाली आणत होता आणि त्याच वेळी ती कोसळली. सुरक्षा उपायांशिवाय ही लिफ्ट बसवण्यात आल्यामुळे हे भयंकर कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे.
पवनदीप सहानी असे ह्या मृत व्यक्तीचे नाव आहे. भिवंडीतील निजामपुरा येथे मंगळवारी ही घटना घडली. सुरक्षेचे उपाय न पाळता बेकायदेशीरपणे लिफ्ट बसविल्याप्रकरणी निजामपुरा पोलिसांनी कारखान्याचा मालक आणि त्या व्यक्तीसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. निजामपुरा पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला खोणी गावातील यंत्रमाग कारखान्याच्या नूतनीकरणाच्या काम मिळाले होते. मालक हसमुख पटेल (४०) आणि राजेश कुमार यादव (४२) अशी ओळख असलेल्या दोन आरोपींनी कारखान्यात तात्पुरत्या कामासाठी सुरक्षा प्रमुखांची तपासणी न करता ही लिफ्ट बसवली अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु
उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?
साडेतीन मिनिटानंतर ती ‘पास्ता’वली आणि तिने केली कंपनीची तक्रार
मंगळवारी सहानी हे जड साहित्य तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर नेत असताना अचानक लिफ्ट कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीप बने म्हणाले, “आरोपींना लिफ्ट बांधण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकार्यांकडून कोणतीही परवानगी मिळाली नव्हती. त्यांच्या जागेवर अनेक जोखीम घटक आहेत जे मजुरांसाठी धोकादायक आहेत. आम्ही कारखान्याच्या मालकावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”