30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामापूर्वपरवानगी न घेता बांधलेली लिफ्ट कोसळली आणि एक जीव गेला

पूर्वपरवानगी न घेता बांधलेली लिफ्ट कोसळली आणि एक जीव गेला

सुरक्षा उपायांशिवाय ही लिफ्ट बसवण्यात आल्यामुळे हे भयानक कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे.

Google News Follow

Related

भिवंडीत लिफ्ट कोसळल्यामुळे एका ४६ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. लिफ्टमधून तो काही जड साहित्य खाली आणत होता आणि त्याच वेळी ती कोसळली. सुरक्षा उपायांशिवाय ही लिफ्ट बसवण्यात आल्यामुळे हे भयंकर कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे.
पवनदीप सहानी असे ह्या मृत व्यक्तीचे नाव आहे. भिवंडीतील निजामपुरा येथे मंगळवारी ही घटना घडली. सुरक्षेचे उपाय न पाळता बेकायदेशीरपणे लिफ्ट बसविल्याप्रकरणी निजामपुरा पोलिसांनी कारखान्याचा मालक आणि त्या व्यक्तीसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. निजामपुरा पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला खोणी गावातील यंत्रमाग कारखान्याच्या नूतनीकरणाच्या काम मिळाले होते. मालक हसमुख पटेल (४०) आणि राजेश कुमार यादव  (४२) अशी ओळख असलेल्या दोन आरोपींनी कारखान्यात तात्पुरत्या कामासाठी  सुरक्षा प्रमुखांची तपासणी न करता ही लिफ्ट बसवली अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मंगळवारी सहानी हे जड साहित्य तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर नेत असताना अचानक लिफ्ट कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीप बने म्हणाले, “आरोपींना लिफ्ट बांधण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांकडून कोणतीही परवानगी मिळाली नव्हती. त्यांच्या जागेवर अनेक जोखीम घटक आहेत जे मजुरांसाठी  धोकादायक आहेत. आम्ही कारखान्याच्या मालकावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा