मुंबईतील भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आज दुपारी भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगीचे कारण अजून स्पष्ट झालेली नाही. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.
अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार हा फायर कॉल दोन नंबरचा आहे. गेल्या एक दोन तासापासून ही आग लागली असून, व्हिडिओ पाहून या आगीची तीव्रता लक्षात येत आहे. झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागल्याने धुरांचे लोट परिसरात दिसून येत होते. आग लागताच अग्निशमच्या दहा गाड्या घटनास्थळी तात्काळ तैनात झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
मुंबईमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भायखळा परिसरात गोदामाला आग लागली होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र या आगीचेही कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर त्यावेळीच भायखळा येथील सप्तश्री मार्गावर भीषण आग लागली होती. ही आग मोठ्या स्वरुपाची होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दहा ते बारा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यातही गोडाऊनचे खूप नुकसान झाले होते.
हे ही वाचा:
अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता
आता बाजारात येणार पतंजलीचे क्रेडिट कार्ड
काही दिवसांपासून भायखळा परिसरात आग लागल्याच्या घटना वाढत आहेत. मात्र मुख्य म्हणजे प्रत्येक घटनेत आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.