गुजरातमध्ये सापडला खोट्या नोटांचा साठा

विशेष म्हणजे या नोटा चलनी नसल्याचे एका छोट्याश्या चुकीमुळे पोलिसांच्या लक्षात आले आणि ही कारवाई करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये सापडला खोट्या नोटांचा साठा

गुजरातमध्ये पोलिसांना खोट्या नोटांचा मोठा साठा सापडला आहे. गुजरातमधील कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या चलनी नोटांचे मूल्य २५ कोटी ८० लाख रुपये इतकं आहे. विशेष म्हणजे या नोटा चलनी नसल्याचे एका छोट्याश्या चुकीमुळे पोलिसांच्या लक्षात आले आणि ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जातं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवले आणि तपासणी केली असता पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. या रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नसून चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या पोलिसांना आढळून आल्या.

हे ही वाचा:

देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याआधी उधमपूर बॉम्बस्फोटाने हादरले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

रुग्णवाहिकेमध्ये सहा कंटेनरमध्ये १ हजार २९० पाकिटांमध्ये दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. या नोटांचे चलनी मूल्य हे २५ कोटी ८० लाख इतकं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या नोटांवर रिझर्व्ह बँक असे लिहलेले नसून रिव्हर्स बँक असे छापण्यात आले आहे. या नोटा जवळून पाहिल्यावर या नोटांमध्ये फरक दिसून येतो. बँकेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमला या नोटांची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे हितेश जोसर यांनी या कारवाईची माहिती दिली एएनआयला दिली आहे.

Exit mobile version