सोन्याची बनावट नाणी देणाऱ्या मारवाडी टोळीचे पितळ उघडे

सोन्याची बनावट नाणी देणाऱ्या मारवाडी टोळीचे पितळ उघडे

साेन्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत त्यांना बनावट नाणी देऊन फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील आंतरराज्य मारवाडी टाेळीचे पितळ पाेलिसांनी उघडे पाडले आहे. ही टाेळी धातूची नाणी साेन्याची असल्याचे सांगत लाेकांची लुबाडणूक करायची असल्याचे उघड झाले आहे.

वसई गुन्हे शाखेने आंतरराज्य मारवाडी टाेळीचा भांडाफाेड करत या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पाेलिसांनी या प्रकरणी मारवाडी टाेळीतील किशनभाई कस्तुरभाई मारवाडी सलाट, हरिभाई प्रेमाभाई मारवाडी सलाट, मनीष कमलेशभाई शहा या तीन आरोपींना अटक केली आहे. तिघेही आरोपी गुजरात राज्यातील बडोदा जिल्ह्यातील खोडीयार नगरचे रहिवाशी आहेत.

तिन्ही आरोपींकडून २ कोटी १८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी गुजरात राज्यातील असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन सोन्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत होती. धातूची नाणी सोन्याची असल्याची भासवून ही टोळी लोकांकडून पैसे उकळायचे. वसई गुन्हे शाखा कक्ष ०२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह पोलीस हवालदार मंगेश चव्हाण, संजय नवले, महेश पागधरे, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, पो नि प्रशांत कुमार ठाकूर, अमोल कोरे, दादा आडके, सुधीर नरळ या पथकांनी सायबर शाखेच्या मदतीने या टाेळीच्या बनावटगिरीचा बिमाेड केला आहे.

हे ही वाचा:

पर्समधून बाळाला पळवून नेणारी नर्स ताब्यात

“धनगर समाजाच्या समस्या, प्रश्न मार्गी लावणार”

द्राैपदी मुर्मू साेमवारी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; २१ ताेफांची सलामी देणार

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

नकली नाणी देऊन ३ कोटींची फसवणूक

विरार पोलीस ठाणे हद्दीत १८ एप्रिल २०२२ रोजी अपेक्ष हॉटेल समोर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या बाजूला झाेपडपट‌्टीत राहणाऱ्या एका माणसाला धातूच्या नाण्याने भरलेल्या पिशवीत साेन्याची नाणी असल्याचे सांगत हेमंत वाविया या इसमाची तब्बलू ३ काेटी १२ लाख रुपयांची फसवणूक या आराेपींनी केली हाेती, या प्रकरणी विरार पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आ ला हाेता.

Exit mobile version