कपडा व्यापाराची सव्वा दोन कोटींची फसवणूक

१२ जणांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा

कपडा व्यापाराची सव्वा दोन कोटींची फसवणूक

ठाण्यातील एका व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील माजिवडा येथील कपडा व्यापाऱ्याची १२ जणांनी मिळून फसवणूक केली. या फसवणूकप्रकरणी १२ जणांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपडा व्यापारी श्रीराम किसनस्वरूप गोयल यांच्याकडून कडून १२ जणांनी आपसात संगनमत करून कपड्याचा माल घेतला. मात्र, या बदल्यात त्यांना खोट्या सह्यांचे धनादेश दिले आणि त्यांची सव्वादोन कोटींची फसवणूक केली. या फसवणूकप्रकरणी १२ जणांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ कुमार अग्रवाल, जॉन टेलर डे, मयांक तिवारी, सुप्रिया मुन्शी, मुकेश शर्मा, ऋषी त्रिपाठी, ऋषिकांत पासवान, विक्रांत कुमार, दास राजदीप सुप्रम, सजीत नारायण, अंकुश मिश्रा, गगनदीप सैनी अशी गुन्हा दाखल झालेल्या १२ जणांची नावे आहेत.

या सर्व आरोपींनी आपसात संगनमत करून श्रीराम गोयल यांच्याकडून २ कोटी २५ लाख ३९ हजार ६२६ रुपये किंमतीच्या कपड्याच्या मालाची खरेदी केली. ९ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान कशेळी येथील राजलक्ष्मी कमर्शियल कॉम्प्लेक्समधून ‘टॉपमेन इंटरनॅशनल’ या कंपनीचा माल ते घेऊन गेले होते. व्यवहाराच्या वेळी या सर्वांनी आपसात संगनमत करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे नसतानाही श्रीराम गोयल यांना सव्वादोन कोटींचा खोट्या सह्यांचा धनादेश देऊन त्यांची फसवणूक केली.

हे ही वाचा:

गाझामध्ये लवकरच जमिनीवरील लढाई; हमासचा उच्च नौदल अधिकारी ठार

‘महुआ यांनी लॉग-इन, पासवर्ड शेअर केले, मोदींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न’

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रीराम यांनी तातडीने नारपोली पोलीस ठाणे गाठून १२ जणांविरोधात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Exit mobile version