26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामागँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी संबंधित ठाण्यातील फ्लॅट जप्त

गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरशी संबंधित ठाण्यातील फ्लॅट जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित ईडीची कारवाई

Google News Follow

Related

अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी संबंधित फ्लॅट जप्त करत ईडीने कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे. ठाणे येथील निओपोलिस टॉवरमध्ये असलेला हा फ्लॅट एप्रिल २०२२ पासून तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आला होता.

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या संबंधीत ठाण्यातील फ्लॅट जप्त केला आहे. ही संपत्ती खंडणीच्या माध्यमातून घेण्यात आली होती, असा आरोप आहे. या प्रकरणी २०१७ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. चौकशीत ही मालमत्ता खंडणीच्या माध्यमातून घेतल्याचे उघड झाले. २०२२ मध्ये चौकशीनंतर ईडीकडून अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. २०१७ मध्ये ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने गुन्हा दाखल केला होता.

इक्बाल कासकार आणि त्याचा साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी व्यापाऱ्यांकडून संपत्ती वसूल केल्या होत्या. बिल्डरांवर दबाव टाकून मुमताज शेख याच्या नावावर रजिस्टर करण्यात आले होते. या मालमत्तेची किंमत ७५ लाख रुपये आहे. २०२२ मध्ये तपास यंत्रणेने पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते, हे ठाणे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित होते. यात खंडणीपासून अनेक गंभीर आरोपांचा समावेश होता.

हे ही वाचा:

दिल्लीतील इमिग्रेशन रॅकेटचा पर्दाफार्श; ११ जणांना घेतले ताब्यात

बीकेआय प्रतिबंधित दहशतवादी गटाला शस्त्र पुरवठा करणाऱ्याला मुंबईत ठोकल्या बेड्या

चित्रपटांसाठी १८ राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असणारे श्याम बेनेगल यांची कारकीर्द कशी होती?

मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!

नेमकं प्रकरण काय?

संबंधित प्रकरण २०१७ मध्ये कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या तक्रारीचे असून हे प्रकरण ठाणे खंडणी विरोधी कक्षाने हाताळले होते. इक्बाल कासकरने त्याचे सहकारी मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांच्यासमवेत दाऊद इब्राहिमशी जवळीक साधत सुरेश मेहता या रिअल इस्टेट डेव्हलपरकडून मालमत्ता आणि रोख रक्कम दोन्ही लुटण्यासाठी त्यांच्या कनेक्शनचा फायदा घेतला. सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा हा फ्लॅट शेखच्या नावाखाली जबरदस्तीने हस्तांतरित करण्यात आला, तर फसव्या धनादेशाद्वारे फसव्या मार्गाने १० लाख रुपयांची अतिरिक्त रोख रक्कम उकळण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा