मुंबईत पंचतारांकित हॉटेलच्या महिला सुरक्षा रक्षकावर बलात्कार

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या महिला सुरक्षा रक्षकावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईत पंचतारांकित हॉटेलच्या महिला सुरक्षा रक्षकावर बलात्कार

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या महिला सुरक्षा रक्षकावर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील पॉश कुलाबा परिसरात हे हॉटेल आहे. हॉटेलच्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यावर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा व्यवस्थापकाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी या हॉटेलच्या व्यवस्थापकावर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी बराच काळ तिचा लैंगिक छळ करत होता. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासह तिला धमकावत होता. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत महिला सुरक्षारक्षकावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पिडीतेला जातीवाचक टिपणी केल्याचाही आरोप आहे.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

पंचतारांकित हॉटेलला सुरक्षा असणाऱ्या जी ४ एस च्या सुरक्षा व्यवस्थापकावर बलात्काराचा आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, आरोपी नियमितपणे तिच्यावर जातीय आणि जातीय टिप्पणी करत असे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भारतीय नौदलाच्या जवानांनी १९ वर्षीय महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतरची ही दुसरी बलात्काराची घटना आहे. या प्रकरणी दक्षिण मुंबईतील कफ परेड पोलिस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version