उलवे येथील एक विचित्र घटना समोर आली आहे. इंडियन मॉडेल स्कूल मधल्या एक स्कूलबसने एका रिक्षाला धडक दिली. ती बस एक मद्यपी चालक चालवत होता पण सुदैवाने त्या बसमधील ४० विद्यार्थी मात्र या अपघातातून बचावले.
अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे एनआरआय कोस्टल पोलिस स्टेशनला इंडियन मॉडेल स्कूल (आयएमएस) उलवेला मद्यधुंद चालकावर कारवाई करण्यासाठी एक संदेश पाठवण्यास भाग पाडले. आयएमएसचे कंत्राटी वाहतूकदार संजय जळगावकर हे या बसचे मालक आहेत , तर अशोक थोरात (६५) हे वाहन चालवत होते. एनआरआय पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे म्हणाले, “आरोपी ड्रायव्हरला एनएमएमसी रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे तो मद्यधुंद असल्याची पुष्टी झाली. त्याच्यावर आयपीसी आणि एमव्हीएच्या संबंधित कलमांतर्गत बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
हे ही वाचा:
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’
महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले
नशिबाने एकही विद्यार्थ्याला हानी झालेली नाही. परंतु वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यावर या चालकाची कडक चौकशी होईल अशी माहिती समोर आलेली आहे. या घटनेची पुष्टी करताना आयएमएस शाळेचे कर्मचारी वैभव पंडित म्हणाले, “आमच्या मुख्याध्यापिका वृषाली पराडकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.”