पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडाला?

कोणतीही उडणारी वस्तू सापडली नसल्याची माहिती उघडकीस

पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून ड्रोन उडाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरून ड्रोनसारखी वस्तू उडताना दिसल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोमवार, ३ जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रूम म्हणजेच पीसीआरला पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या वर ड्रोनसारखी उडणारी वस्तू असल्याचा फोन आला. पोलिसांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र, पोलिसांनी तपास केला असता, आतापर्यंत असे काहीही आढळून आलेले नाही.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एका अनोळखी उडत्या वस्तूची ड्रोनसदृश्य वस्तू हवेत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून माहितीनुसार आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला. परंतु, अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. शिवाय, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (ATC) देखील ही माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यांनाही पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ अशी कोणतीही उडणारी वस्तू सापडली नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे ही वाचा:

इसिसशी संपर्क असल्याच्या संशयावरून एनआयएची मुंबई, पुण्यात छापेमारी

भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

अमित शहांची मध्यस्थी; दोन महिन्यांनंतर मणिपूरमधील राष्ट्रीय महामार्ग मोकळा

आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे

पंतप्रधान निवासस्थानी अत्यंत कडक सुरक्षा असते. शिवाय हा परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून देखील घोषित असतो. त्यामुळे या परिसरात अकाशात विमाने उडवायला देखील परवानगी नसते. तसेच त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्यांचीही कडक तपासणी होते. त्यांना ओळखपत्राशिवाय आत पाठवले जात नाही.

Exit mobile version