पुण्यातील मांगडेवाडी कात्रज या ठिकाणी कल्पना आनंद क्लिनिकमध्ये प्रकार घडला आहे. ३२ वर्षीय महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून, तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना १ जुलै २०२२ पासून आतापर्यंत घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने डॉक्टर विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे. डॉ. अमित आनंदराव दबडे (वय २९ वर्ष, रा. आंबेगाव खुर्द, पुणे) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी कल्पनानंद क्लिनिक आहे.
हे ही वाचा:
एअर इंडियात होणार एक हजार वैमानिकांची भरती
महाराष्ट्रदिनी माविआची असेल शेवटची वज्रमूठ
२ कोटी लोकांना एफएम सुरांची भेट
रामलला २२ जानेवारीला गाभाऱ्यात होणार विराजमान !
सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता पीडित महिला आल्यानंतर, त्याची तिच्याशी ओळख झाली होती.ओळख झाल्यानंतर त्या महिलेची विचारपूस करण्यासाठी तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मेसेज आणि कॉल करू लागला.कॉल करून त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढून हॉस्पिटल मध्ये बोलवून घेतले.हॉस्पिटल मध्ये बोलवून तो तिच्याशी बळजबरी करून बलात्कार करत असे असा महिलेचा आरोप आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा महिलेला मागील कित्येक दिवसापासून केलेल्या अत्याचाराची माफी पाहण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिक मध्ये बोलवून तिच्या अंगलट येण्याचा प्रयत्न करत असे. तिची संमती नसतानाही शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतरही महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. सतत होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली.त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला.महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस तावडे याबाबत पुढील तपास करत आहेत.