26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामाअपंग तरुणाने केले २ वर्षाच्या मुलीचे अपहरण

अपंग तरुणाने केले २ वर्षाच्या मुलीचे अपहरण

नशेडी अपंग तरुणाने केले मुलीचे अपहरण

Google News Follow

Related

चोरी किंवा अपहरण करण्यासाठी आरोपीचे हात, पाय व्यवस्थित असावे असा काही नियम नाहीये, पण या गोष्टीचा अपवाद असून वांद्रे परिसरात एक घटना घडली आहे. यामध्ये गुडघ्यापासून पाय नसणाऱ्या एका तरुणाने दोन वर्षाच्या मुलीचा अपहरण केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या आरोपीचे नाव आशिक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सीसीटीव्ही चित्रफीत जाहीर करून हा आरोपी दिसल्यास संपर्क करण्याचे अवाहान पोलिसांनी केले आहे.

नशा करणारा आशिकला गुढघ्यापासून पुढे पाय नाहीत. मात्र तो गुढघे घासत चालतो. तसेच त्याला आमली पदार्थ नशा करण्याची सवय असून तो भीक मागत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वांद्रे परिसरात राहणारी दोन वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना, आरोपी आशिकची नजर या २ वर्षाच्या चिमूकलीवर पडली. आशिक ने गोड बोलून, चॉकलेटचे चे आमिष दाखवत मुलीला कडेवर घेतले.

पालकांना मुलगी बऱ्याच वेळ झाला खेळताना दिसली नाही म्हणून शोधाशोध केली तरीही सापडली नाही. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यामध्ये आरोपी आशिक मुलीला कडेवर घेऊन जात असल्याचे दिसले. कुटुंबीयांनी तातडीने वांद्रे पोलिस स्थानक गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेत, तपास कार्यास सुरुवात केली. मात्र अद्याप आरोपी आशिकचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

मेस्सी म्हणतो हा माझा शेवटचा विश्वचषक

आरोपी आशिक हा आमली पदार्थांचा सेवन करत असे, तसेच त्याला भीक मागण्याची सवय देखील आहे. बाजारपेठ, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे किंवा नशा करण्यासाठी नशेबाज एकत्र जमतात अशा ठिकाणी आशिक येण्याची शक्यता आहे असे पोलिसांनी सांगितले. अशा परिसरात नागरिकांच्या नजरेत आल्यास स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन वांद्रे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा