…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली

एक मृत घोषित केलेली मुलगी ७ वर्षानंतर परत आली, पण तिचा निर्दोष गुन्हेगार अजूनही ७ वर्षांची शिक्षा भोगत आहे.

…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
तुरुंगातून मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे ऐकले आहे का? ही कल्पना नसून सत्य आहे. एकदा मृत घोषित केलेली मुलगी ७ वर्षानंतर परत आली, पण तिचा निर्दोष गुन्हेगार अजूनही ७ वर्षांची शिक्षा भोगत आहे.
अलीगढमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे जी ७ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली . खून झालेली मुलगी  चक्क ७ वर्षांनंतर जिवंत सापडली. अखेर हत्या करण्यात आलेल्या मुलीला जिवंत पाहून सर्वांनाच धक्का बसला. आश्चर्य म्हणजे सात वर्षांपूर्वी या मुलीचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी एका तरुणालाही अटक करण्यात आली होती. त्या तरुणाचे नाव विष्णू असे आहे.
वडिलांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. थोडा दिवसांनंतर पोलिसांना एक शव मिळाले . वडिलांनी त्या शवाचे कपडे पाहून ते शव त्यांच्या मुलीचे आहे असे त्यांनी सांगितले. या आरोपाचा दोष त्यांनी विष्णूवर टाकला आणि त्याला ७ वर्षाची कोठडी सुनावण्यात आली. विष्णूची आई म्हणजे सुनीता यांनी आपल्या निष्पाप मुलाला त्याच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्या अयशस्वी ठरल्या. परंतु त्यांनी त्या मुलीचा शोध सुरू ठेवला.
आश्चर्य म्हणजे सुनीता यांना ती मुलगी अगदी सुखरूपपणे सापडली. ती मुलगी विवाहित असून ती पती आणि दोन मुलांसह आनंदी जीवन जगत असल्याचे समोर आले. हा प्रकार सुनीताने पोलिसांना सांगितला. अखेर पोलिसांनीही सुनीताचे म्हणणे ऐकून घेतले आणि तपासानंतर सत्य समोर आले.
आता पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे आणि लवकरच न्यायालयात हजर करून तिला तुरुंगात पाठवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. असेही समोर आले आहे की ती मुलगी जिवंत आहे हे तिच्या वडिलांनादेखील माहित होतं आणि बळजबरीने त्याला तुरुंगात टाकले. या मुलीला नेमकी कोणती शिक्षा मिळणार आहे हे समोर आलेले नाही.

हे ही वाचा :

काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव

आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका

भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी

आता ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांसमोर एक अवघड आव्हान निर्माण झाले आहे. ज्या मुलीचा मृतदेह तिच्या मुलीचा असल्याचे ओळखले गेले त्या मुलीचे वडील कोण आहेत? त्याचे काय झाले हे रहस्यच राहिले आहे. त्याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. आता या प्रकरणाचे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Exit mobile version