उत्तर प्रदेशमधील संभल येथील शाही जामा मशिद परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर शुक्रवारच्या नमाजासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण विभागाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून नमाजदरम्यान शांतता राखण्यासाठी प्रादेशिक आर्म कॉन्स्टेबलरी (पीएसी) पथकाच्या १२ तुकड्या आणि इतर दलही तैनात करण्यात आले आहे.
चंदौसी जिल्ह्यात पीएसीच्या १५ तुकड्या, रॅपिड ऍक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था बळकट केली असून ७० न्यायदंडाधिकारी ड्युटीवर तैनात केले आहेत. तसेच सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील भागांवर लक्ष ठेवले जात आहे. मशिदीबाहेर नमाज पढण्यास बंदी घालण्यात आली असून केवळ मशिदीच्या आत नमाजपठण करण्यास परवानगी आहे. जामा मशिदीजवळ दंगलविरोधी पथक आणि मेटल डिटेक्टर तैनात करण्यात आले आहेत.
संभलमध्ये कलम १६३ लागू राहणार असून या अंतर्गत एकाच ठिकाणी चारहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. संभलमध्ये इंटरनेट बंद राहणार आहे. जामा मशिदीच्या बाहेर नमाज होणार नाही, फक्त मशिदीच्या आवारात परवानगी देण्यात आली आहे. जामा मशिदीच्या आसपासच्या लोकांनाच मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी असेल. मशिदीच्या सर्व दरवाजांवर मेटल डिटेक्टर बसवले जातील जेणेकरून कोणीही आत शस्त्रे घेऊन जाऊ नये.
#WATCH | Rapid Action Force (RAF) deployed in Uttar Pradesh's Sambhal
Stone pelting incident took place here on November 24 over the Shahi Jama Masjid survey. Friday prayers will be offered at the mosque today pic.twitter.com/ZD5dGte9oH
— ANI (@ANI) November 29, 2024
जामा मशीद आणि न्यायालयाजवळ दंगलविरोधी पथक तैनात करण्यात येणार आहे. जामा मशिदीच्या आजूबाजूच्या घरांच्या गच्चीवर पोलिस तैनात असतील. खबरदारी घेत पोलिसांनी शुक्रवारपूर्वी ५० हून अधिक समाजकंटकांना ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा:
फडणवीस, शिंदे, अजित पवारांची अमित शहांशी चर्चा
ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!
संभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश
एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील
उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला असून हिंदू बाजूने सर्वेक्षणासाठी न्यायालयात दाद मागितली होती, न्यायालयाने हिंदू बाजूने केलेल्या मागणीला हिरवा कंदील देत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार उसळला असून अजूनही या भागात तणाव आहे.