32 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरक्राईमनामाआमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह १५जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह १५जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल

वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Google News Follow

Related

अदिशक्ती ‘युट्युब चॅनेल’ आणि ‘ग्लोबल म्युझिक जंक्शन’ या दोन्ही कंपनीसोबत झालेल्या आर्थिक व्यवहाराचा करार रद्द करण्यासाठी ‘ग्लोबल म्युझिक डिजिटल’ या कर्ज देणाऱ्या कंपनीच्या सीईओला पिस्तुल धाक दाखवून त्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी गोरेगाव पूर्व येथे घडली. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह १० ते १५ जणांविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोरेगाव पूर्व येथे वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारी ग्लोबल म्युझिक जंक्शन ही कंपनी ओटीटी डिजिटल कंपन्यांना कर्ज देते. या कंपनीने ५ वर्षाच्या करारावर आदिशक्ती प्रा. लिमिटेड या युट्युब चॅनेलचे मालक मनोज मिश्रा यांना ८ कोटींचे कर्ज दिले होते. मनोज मिश्रा याने पैसे परत न करता करार रद्द करण्यासाठी तगादा लावला होता, त्यासाठी तो ग्लोबल कंपनीच्या सीईओवर दबाव आणत होता.

बुधवारी दुपारी ग्लोबल कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांना एक फोन आला आणि फोन करणाऱ्याने “मै आमदार प्रकाश सुर्वे के ऑफिस से बात कर रहा हु, आप इधर आ जाना” असे म्हटले. राजकुमार सिंह यांनी फोन करणाऱ्याला शनिवारी येतो म्हणून सांगत फोन कट केला. काही वेळाने ग्लोबल कंपनीच्या कार्यालयात १० ते १५ जण बळजबरीने घुसले आणि त्यांनी कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांना बळजबरीने पिस्तुलचा धाक दाखवून मोटारीत बसवून आमदार सुर्वे यांच्या दहिसर येथील युनिव्हर्सल शाळेच्या शेजारी असलेल्या कार्यालयात आणण्यात आले.

त्या ठिकाणी आदिशक्ती युट्युब चॅनेल चा मनोज मिश्रा, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राजू सुर्वे आणि १० ते १५ जण उपस्थित होते. त्यांनी राजकुमार यांना मारहाण करून धमकी देत एका स्टॅम्प पेपर वर आदिशक्ती कंपनीसोबतचा करार रद्द झाला असल्याच्या करारावर स्वाक्षरी घेतली, राजकुमार सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान याबाबत पोलिसांना काही सांगू नको किंवा तक्रार केली तर परिणाम वाईट होईल अशी धमकी देखील देण्यात आली असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

केरळचे नाव बदलणार? विधानसभेने एकमताने मंजूर केला ठराव

पाकिस्तानची संसद बरखास्त; पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळही संपुष्टात

‘माझी माती माझा देश’मधून स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता

पुण्यातील दहशतवाद प्रकरणाचा तपास एनआयए करणार

वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह इतर जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलिसांनी या प्रकरणात भादंवि कलम ३६४- अ, ४५२, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ आणि ५०६ आणि ३, २५ शस्त्रास्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा