पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुस्लीम व्यक्तीने एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. संताप जनक म्हणजे आरोपी जीहाद्याने अत्याचार करून अल्पवयीन मुलीच्या गुदद्वारात धातूचा अणकुचीदार खिळा टाकला आणि पळ काढला. मंताज हुसेन (२५) असे आरोपीचे नावे आहे. पोलिसांनी आरोपीला कोलकात्याच्या न्यू टाउन परिसरातून अटक केली आहे. अल्पवयीन हिंदू मुलगी आता रुग्णालयात उपचार घेत आहे आणि तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन हिंदू मुलगी कोलाघाट परिसरातील रहिवासी आहे. ती फक्त अकरा वर्षांची आहे. आरोपी मंताज हुसेन देखील त्याच परिसरात राहतो. मुलीचे पालक जवळच्याच एका कपड्याच्या कारखान्यात कामगार म्हणून काम करतात. पिडीत अल्पवयीन मुलीला एक मोठी बहिण आहे.
वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांपासून मंताज हुसेन पीडित मुलीच्या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मोठ्या बहिणीचा पाठलाग करत होता. मंताजने तिला प्रपोज देखील केला, परंतु मोठ्या बहिणीने नकार दिला. मंताज संतापला आणि तिला धमकावले. यामुळे तिच्या पालकांनी तिला सुरक्षिततेसाठी एका नातेवाईकाच्या घरी हलवले. मोठ्या बहिणीला नातेवाईकांकडे पाठल्यामुळे पिडीत अल्पवयीन मुलगी पालक कामावर गेल्यानंतर घरी एकटीच असे.
हे ही वाचा :
तुकाराम ओंबाळे यांचे बंधू काय म्हणाले तहव्वुर राणाच्या शिक्षेबद्दल ?
येमेनच्या राजधानीवर रात्रभर अमेरिकेचे हवाई हल्ले
“रात्रभर झोपच लागली नाही…” काय घडलं रजत चौहानसोबत?
याच संधीचा फायदा घेत आरोपी मंताज घरात घुसला आणि मुलीला चाकूने धमकावत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर,आरोपी मंताजने तिच्या गुदद्वारात धातूचा अणकुचीदार खिळा घातला आणि निघून गेला. तिचे पालक कामावरून परतल्यावर त्यांना त्यांच्या मुलीला रक्तस्त्राव झालेले दिसले. पिडीत अल्पवयीन मुलीने पालकांना सर्व सांगितले.
यानंतर त्वरित तिला स्थानिक रुग्णालयात नेले आणि नंतर तिला तामलुक रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या, तिच्यावर तामलुक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि कोलकात्याच्या न्यू टाउनमधून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
#WestBengal
A case of brutal rape and brutal torture has come from the Purba Medinipur district of West Bengal where an Islamist named Mantaj Hossain(25) raped a minor Hindu girl(11).After the rape, Mantaj also inserted a fork in her anus and fled.
Later the Police arrested… pic.twitter.com/lprZCFOZPw
— Hindu Voice (@HinduVoice_in) April 10, 2025