तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये ‘सनातन धर्म’ याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता झाला होता.
उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवार, २ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचे उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं,” असं विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं.
An FIR was registered against Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin & Karnataka Minister Priyank Kharge in Uttar Pradesh's Rampur over 'Sanatan Dharma' remarks after a complaint from Advocates.
— ANI (@ANI) September 6, 2023
हे ही वाचा:
राष्ट्रपतींच्या जी २० निमंत्रणाआधी ‘भारत’ नाव ब्रिक्सच्या अधिसूचनेतही
इंडिया आघाडीच्या पुढील बैठकांना पूर्णविराम; संजय राऊतांनी सांगितले कारण
सोमय्या प्रकरणी ‘लोकशाही’चे कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा
राणे-कीर्तिकरांवर चिडून ठाकरेंनी काढले वड्याचे तेल वांग्यावर…
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी समर्थन केले होते. त्यामुळे या दोघांच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे. वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी उदयनिधी आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर मंगळवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलिस ठाण्यामध्ये आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ ए (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.