पुणे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे रॅप साँग तयार करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल

गाणे शेअर करणाऱ्यावरही गुन्हा दाखल

पुणे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे रॅप साँग तयार करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने गाडीने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येत असून या प्रकरणाला रोज नवे वळण मिळताना दिसत आहे. १९ मे रोजी पुण्यातील नामांकित बिल्डरचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल हा यावेळी कार चालवत होता. त्याच रात्री या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर केवळ १५ तासांत जामिनावर सोडण्यात आले. यामुळे राज्यासह देशभर संतापाची लाट पसरली होती. सध्या अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात असून त्याचे वडील आणि आजोबा अटकेत आहेत.

या दरम्यान, सोशल मीडियावर एक रॅप साँग व्हायरल झालं होतं. या गाण्यातील मुलगा त्या अपघाताचे समर्थन करत गाणं गात असल्याचे दिसून आले होते. पोर्श कार अपघातानंतर हे रॅप साँग व्हायरल झाले होते. हे गाणं गाणारा मुलगा अल्पवयीन आरोपी असून तो आपल्या कृत्याचे समर्थन करत असल्याचे आणि यानंतरही रस्त्यावर अशाच खेळ करणार असल्याचे सांगतो. या गाण्यामुळे लोकांमध्ये आणखीच चीड निर्माण झाली होती. हा मुलगा वेदांत असल्याच्या बातम्या होत्या, मात्र, कुटुंबीयांनी हे नाकरले होते. आता हे रॅप साँग गाणाऱ्या तरूणाविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

डोंबिवली स्फोट प्रकरण, कंपनी मालकाची सुटका!

अजय देवगण, रोहित शेट्टी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले ‘सिंघम अगेन’चे शूटिंग!

‘हेलिकॉप्टरमधून फिरणारे लवकरच तुरुंगात जातील’

पॅट कमिन्सचा हैदराबादचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीत

पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनीही पत्रकार परिषदेत हा फेक व्हिडीओ असून अल्पवयीन आरोपीच्या नावाने व्हिडीओ करणाऱ्या मुलाचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले होते. अखेर शनिवारी पुणे सायबर पोलिसांनी सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आर्यन देव नीखरा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ५०९, २९४ ब या कलमांनुसार आर्यनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन नीखराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या अपघातामधील आरोपी आणि पीडितांची थट्टा उडविणारा व्हिडीओ तयार करून अपलोड केला होता. दरम्यान पुणे सायबर विभागाने शनिवारी या संबंधी आर्यन नीखरावर गुन्हा दाखल करत त्याचे गाणे शेअर केलेल्या शुभम शिंदे या तरूणावरही गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version