26 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामाप्रवासी बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल

प्रवासी बोटीला धडकणाऱ्या नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल

नेव्हीच्या स्पीड बोटवरील तीन जणांचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

Google News Follow

Related

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी संध्याकाळी मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी ‘नीलकमल’ नावाची प्रवासी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर, बुडालेल्या बोटीतून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. नौदलाच्या एका स्पीड बोटने या बोटीला धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली. यानंतर नौदलाच्या पेट्रोलिंग बोटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटासाठी ‘नीलकमल’ प्रवासी बोट १०० हून अधिक प्रवाशांना घेऊन निघाली होती. काही अंतरावर जाताच भारतीय नौदलाच्या वेगवान स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही धडक इतर जबरदस्त होती की या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कलम १०६(१), १२५(अ)(ब), २८२, ३२४(३)(५) अन्वये तपास सुरू केला आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून ज्या व्यक्तीने बोट धडकल्याचा व्हिडीओ काढला, त्याच व्यक्तीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाथाराम चौधरी असे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी स्पीड बोट वरील चालक आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुर्घटनेनंतर नेव्हीची स्पीड बोट नेव्हीने टो करुन नेली आहे. पोलिसांकडून त्या बोटीची पाहणी केली जात आहे.

हे ही वाचा..

उद्धव ठाकरे फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हणतात आणि त्यांना भेटायलाही येतात, याची कीव येते!

भोजनालयात धूम्रपान : मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना दंड

सर्व धार्मिक स्थळे सरकारच्या नियंत्रणाखाली आणा! विशिष्ट धर्माचीच का?

कुर्ला बस अपघात प्रकरण, बेस्ट कंत्राटदाराला ठोठावणार ४ लाखांचा दंड!

नेव्हीच्या स्पीड बोटवरील तीन जणांचा यात मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मात्र, या चौघांपैकी स्पीड बोट नेमकी कोण चालवत होतं, याबद्दल नेव्हीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा