तेलंगणा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाचा एक एडिटेड व्हिडीओ शेअर केला होता. यावरून भाजपावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजपा नेत्यांकडून या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांनी याबाबत एफआयआर नोंदवला आहे. गृहमंत्र्यांच्या एडिट केलेल्या व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांना दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये एक तक्रार भाजपाकडून करण्यात आली होती, तर दुसरी तक्रार गृह मंत्रालयाने केली होती. तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल सायबर विंग IFSO युनिटने एफआयआर नोंदवला आहे. अमित शाहांच्या एका व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा भाजपाने आणि गृह मंत्रालयाने केला आहे. भाजपा आणि गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आयपीसीच्या कलम १५३/१५३ए/४६५/४६९/१७१जी आणि आयटी कायद्याच्या कलम ६६सी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गृहमंत्र्यांच्या एडिट व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांनी एक्स आणि फेसबुकला पत्र लिहिले आहे. तसेच हा एडिट केलेला व्हिडीओ कोणत्या अकाउंटवर टाकण्यात आला आहे, याची माहिती दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मागवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मोदी कन्नडिगांना पापी म्हणत असणारा एडिटेड व्हिडीओ प्रियांक खरगेंकडून व्हायरल
देबश्री चौधरींचे पोस्टर लावताना भाजपा नेत्या सरस्वती सरकार यांच्यावर प. बंगालमध्ये हल्ला
काँग्रेस संपत्तीच्या वाटणीसाठी वक्फ नव्हे, अन्य समुदायांची संपत्ती घेईल
चेन्नईचे धडाक्यात अव्वल चार संघांमध्ये पुनरागमन!
२७ एप्रिल रोजी, तेलंगणा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलने एक एडिट केलेला व्हिडिओ शेअर केला असून त्यात भाजपा नेते अमित शहा यांनी एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षण संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिल्याचा खोटा दावा केला आहे. काँग्रेसच्या हँडलने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भाजपमधील एससी, एसटी, ओबीसी अल्पसंख्याक असलेल्या आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या बंधू आणि भगिनींनो, कृपया हा व्हिडीओ बघा आणि भाजपला मतदान करायचे की नाही याचा निर्णय घ्या. ते अभिमानाने आणि अहंकाराने पुन्हा सत्तेत आल्यास भारताच्या राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाची फळे चाखणाऱ्या एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे आरक्षण काढून टाकू, असे सांगणाऱ्या अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या भाजपा पक्षाला योग्य धडा शिकवूया,” असे ट्वीट तेलंगणा काँग्रेसने केले आहे. ‘भाजपला सत्तेतून हटवा…देश वाचवा. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करूया. भारतीय राज्यघटनेची भरभराट झाली पाहिजे,’ असेही यात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुस्लिम समाजाचे घटनाबाह्य आरक्षण संपवून ते एससी, एसटी आणि ओबीसींना देण्याची शपथ घेतली होती.