25 C
Mumbai
Wednesday, December 18, 2024
घरक्राईमनामाछ. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल

छ. शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल

गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरुंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्रिश्चन धर्मगुरु फादर बोलमेक्स परेरांविरोधात गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. फादर बोलमेक्स परेरा हे दक्षिण गोव्यातली सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर आहेत.

एका कथित व्हिडीओ क्लिपनुसार फादर बोलमेक्स परेररा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले. “काही लोक आहेत ज्यांच्यासाठी शिवाजी महाराज हे दैवत आहेत. शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत आपण त्यांचा योग्य आदर आणि सन्मान केलाच पाहिजे. मात्र, ते देव किंवा दैवत नाही. यासाठी हिंदू बांधवांशी संवाद साधला पाहिजे आणि शिवाजी महाराज तुमचे देव आहेत की, राष्ट्रीय नायकाच्या रुपात तुम्ही त्यांना पाहता? हे विचारलं पाहिजे. जर राष्ट्रपुरुष म्हणून तुम्ही शिवरायांकडे पाहात असाल तर त्यांना दैवत कसं काय म्हणणार?” या आशयाचं वक्तव्य फादर परेरा यांनी केलं होतं. त्यावरुन नवा वाद उभा राहिला होता.

गावकऱ्यांनी फादर परेरा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. फादर परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते, असं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच फादर परेरा यांनी जाणीवपूर्वक आपल्या प्रवचनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त टिपण्णी करुन भावना भडकवण्याचा त्यांचा उद्देश होता, असंही म्हटलं आहे. बोलमेक्स परेरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वास्को पोलीस ठाण्याबाहेर राजपूत करणीसेना, बजरंग दल यांसह सुमारे १०० शिवप्रेमींनी गर्दी केली होती. त्यानंतर त्यांच्या अटकेची देखील मागणी केली जात आहे.

हे ही वाचा:

डोळ्याला पट्टी बांधून असलेल्या आदित्य ठाकरेंना उत्तर देऊन फायदा काय?

कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवानांना वीरमरण

नासामध्ये नोकरी देतो सांगून १११ जणांकडून लुबाडले कोट्यवधी रुपये

नूहच्या हिंसाचारामागे सायबर गुन्हेगार? मिरवणुकीशी काही संबंध नाही

छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत. आम्हा शिवप्रेमींच्या भावना या व्हिडीओमुळे दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींनी या बाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर फादर बोलमेक्स परेरा यांनी खेद व्यक्त करत माझ्या प्रवचनातला काही भाग निवडकपणे समोर आणला गेला असं म्हटलं आहे. राष्ट्रपुरुषांमध्ये छत्रपती शिवरायांची गणना होते. विदेशातील लोकांनाही ते आदरणीय आहेत, असंही फादर परेरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा