संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार झियाउर बुर्क यांच्यावर गुन्हा दाखल

सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप

संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार झियाउर बुर्क यांच्यावर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार भडकावणाऱ्यांवर पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हिंसाचार भडकवणाऱ्या आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रभर छापे टाकले आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्क आणि स्थानिक आमदाराचा मुलगा सोहेल इक्बाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपा खासदारावर सुनियोजित पद्धतीने हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी मशिदीबाहेर जमाव जमवला आणि भडकावला, त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर संभलच्या शाही जामा मशिदीच्या आत सर्वेक्षणाचे काम सुरू होते. पाहणी सुरू असताना अचानक मोठ्या संख्येने लोक मशिदीबाहेर जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर त्यांनी पोलिस पथकावर दगडफेक सुरू केली आणि वाहने पेटवून दिली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि लाठीमार केला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला.

मुरादाबाद विभागीय आयुक्त म्हणाले की, “सर्वेक्षण शांततेत सुरू होते, परंतु काही लोक मशिदीजवळ जमले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. जेव्हा पोलिसांनी परिसर रिकामा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जमावाच्या एका गटाने पोलिसांवर हल्ला केला. हिंसाचार भडकावला आणि हल्लेखोरांनी हळूहळू पोलिसांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.”

हे ही वाचा : 

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानमध्ये ५ टन ड्रग्ज जप्त!

सेन्सेक्स १२०० अंकांनी वधारला

नौदलाच्या INSV तारिणीने ऑस्ट्रेलियातून दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेला सुरुवात

संविधानाला राजकारणापासून दूर ठेवायला हवे

उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला असून हिंदू बाजूने सर्वेक्षणासाठी न्यायालयात दाद मागितली होती, न्यायालयाने हिंदू बाजूने केलेल्या मागणीला हिरवा कंदील देत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हिंसाचाराला प्रत्युत्तर म्हणून, अधिकाऱ्यांनी कठोर सुरक्षा उपाय लागू केले आहेत, प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत आणि परिसरात इंटरनेट सेवा देखील निलंबित केली आहे. नौमान, बिलाल, नईम आणि मोहम्मद कैफ अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या आंदोलकांना गोळ्या लागल्याचे आरोप होत असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version