पिस्तुल दाखवून दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल

पिस्तुल दाखवून दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मनमानी कारभार करणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वर्तणुकीच्या मुद्द्यावरून राज्यात खळबळ उडालेली असताना आता त्यांच्या कुटुंबीयांबद्दलच्या वादग्रस्त गोष्टीही बाहेर येत आहेत. पूजाच्या आईने जमीन खरेदीच्या वादातून शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा जुना व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पूजाची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसाात गुन्हा दाखल झाला आहे.

पूजा खेडकर यांच्या अवास्तव मागण्या आणि ओबीसी आरक्षणाचा गैरवापर अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यावर आरोप होत आहेत. यानंतर आता पूजाचे आई-वडील देखील अडचणीत सापडले आहेत. मनोरमा खेडकर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्याच्या तक्रारीच्या आधारे पौड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्ह्याची नोंद झाली. आयपीसी कलम ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.

मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या गावातील काही शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे. गावातील काही शेतकऱ्यांवर दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत त्यांचे काही अंगरक्षकदेखील दिसून येत आहेत. एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडीओमध्ये इतर लोकही बोलताना दिसत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही असं करू शकत नाहीत, असं ते सांगताना ऐकू येत आहेत. त्यावर मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे, असं त्या गावकऱ्यांना सांगत आहेत.

हे ही वाचा:

महायुतीने आणले मविआच्या नाकी ‘नऊ’

नेपाळमध्ये ‘प्रचंड’ पराभव!

नवाब मलिकांच्या जामीनात दोन आठवड्यांची मुदतवाढ

श्रेयचोरांचे ‘स्मॉलर व्हर्जन’ म्हणजे रोहित पवार…

पूजा खेडकर या २०२३ साली आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना बुलढाण्याला पहिलं ट्रेनी पोस्टिंग मिळालं. पण त्या तिथे जॉईन झाल्या नाहीत. नंतर त्यांना पुण्यात ट्रेनी पोस्टिंग मिळालं. पण तिथे जॉईन व्हायच्या आधीच त्यांनी स्वतंत्र केबिन, स्वीय सहाय्यक अशा मागण्या केल्या. पुण्यातील सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचं केबिनही त्यांनी जबरदस्तीने घेतलं. मुख्य सचिवांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण अधिक प्रकाशझोतात आले.

Exit mobile version